अण्णांबद्दल पारंपारिक आदर आहेच, पण अरविंद
केजरीवालांच्या प्रखरतेसोबत कसं जुळवून घ्यावं हा अण्णान्समोराचा नव्हे तर त्या
टीम मधील इतर सगळ्या ज्येष्ठ मंडळींसमोरचा खरा प्रश्नं आहे किंवा मंडळींची असमर्थता आहे असहि म्हणूच
शकतो ! अण्णा केजरीवालांशी जोडले गेले आणि
तेव्हाच खरे नेशनल हिट ठरले, आताही पुढे केजरीवालान्पासून वेगळे राहिले तर कुठवर मजल मारताएत ते
कळेलच.
अण्णांना
व्यक्ती म्हणुन दुय्यम ठरवणे असा हेतू आहे, असा विचार करणे हे खुळेपणाचच ठरेल. बराच काळ अण्णा ह्या लढाईत आपले नेते राहिले आहेत..मार्गदर्शक राहिले आहेत..तसे ते राहतीलच, पण आपल्या नेत्यांच्या मर्यादा लक्षात घेऊनच अनुयायांनी आपल्या
स्वतःच्या वागणुकीची, धोरणांची आखणी करायला पाहिजे.
याचाच अर्थ उघड आहे की अरविंद केजरीवालांच्या हि काही मर्यादा असतील.. पण त्या
आजवर उघडकिला आलेल्या नाहीत, कळल्या नाहीत..किंवा तिथवर, मर्यादेपर्यंत आज वर गोष्टी
घडल्या नाहीत. कोणाला काही वाटल्या असतील तर सुस्पष्टपणे
कळवाच. अण्णांचं त्यांच्या परीनं जे आजवर चं योगदान आहे ते थोडं नाहीच.. त्याला कोणीही कमी ठरवूच शकत नाही, पण कार्यकर्त्यांमधील वय, मानपान विसरून जर फक्त मोठ्या आंदोलनांसाठी लागणारी प्रगल्भ हाताळणी, प्रभावी कार्यकर्तेपण म्हणुन यावर
जर तौलनिक दृष्ट्या नजर टाकली किंवा काही खूपच बौद्धिक निकष लावले तर एकूणच बदल घडविण्यासाठी केजरीवाल अधिक सक्षम, अधिक पोटंट, अधिक आशादायी वगैरे वाटतात.
Image Source: http://sim.in.com |
शिवाय हल्ली तर बऱ्याचदा केजरीवालांपेक्षा स्वतःला अपोलिटिकल म्हणवणारे, राजकीय पक्ष नको म्हणणारे अण्णाच अधिक राजकीय
पद्धतीनं मतं प्रदर्शित करताना दिसतात..आणि त्याला एक विशिष्ट मागच्या पिढीचा अनाक्रमक, अप्रभावी, डिफेन्सिव्ह, बैक फुटेड अप्प्रोच
असतो. घटक्यात केजरीवालांवर प्रेम, घटक्यात नाराजी. माझं नाव वापरायचं नाही
म्हणायचं.. नंतर म्हणायचं 'मी'च प्रचार करेन. गेल्या काही काळात केजरीवालां इतकं सातत्य स्वतः अण्णांनी
दाखवलं आहे ? नसेल तर का नाही. राजकारण असलं म्हणुन मग तलवार म्यानात का करायची? नाकाला फडकं लावल्या
सारखं का करायचं? लढाई शी प्रामाणिकता का नाही ठेवायची किंवा अवघड लढाई का नाही
घ्यायची अंगावर.. स्वतःच्या प्रकृतीला मानवतील अशा लढाईत का लढायचं ठरवायचं? ज्या मैदानात
स्वातंत्र्य हवंय, त्याचं मैदानात लढायला नकोय. छ. शिवाजी महाराष्ट्रातच होऊन गेले की
नाही, शिवाजींनी शत्रूला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं की नाही, नव्हे तर तसच द्यावं
लागतं, मग हि शिकवण अण्णांनी सेकंडरी का ठरवावी ? खुद्द गांधी हि
राजकारणात पडलेच होते की.. मग गांधीवादी अण्णांची हि कसली जगावेगळी वैचारिक लक्झरी ? ..भल्याभल्यांचे विनोदी विचार वाचायला मिळतात, टीव्हीवर पाहायला मिळतात यावर !
एरवीही सगळे टाहो फोडताच असतात, सुस्कारे सोडताच
असतात की.. की चांगल्या लोकांनी राजकारणात यायला पाहिजे.. सामाजिक कार्यकर्ते
म्हणवणारे तत्वांच्या नावाखाली, निवडणुकीला पैसा कुठून आणायचा इ. इ. कारणं पुढे करून इथं शिस्तीत कच
खातात... मग अरविंद केजरीवालांनी हे धैर्य दाखवलं, द्रष्टेपणा दाखविला तर त्यासाठी आदर
दाखवायचं सोडून शंका का मिरवायच्या ? मला तर वाटतं, मुळात केजरीवालां
मध्ये जितकी 'इनर स्टीम' आहे लढत राहण्याची..जे प्लान्निंग आहे, जेही समोर येईल ते अंगावर घेण्याची समर्पकता आहे, ती आजही संपूर्ण आंदोलनाच्या गर्दीत तितकीच अभावानेच
सापडते..ती इतरांमध्ये अनुपस्थित आहे..हे ते इतर दाखवूनही देता आहेत स्वत: हून.
ह्या लढाईत केजरीवाल हे निश्चित अधिक कौशल्याचे योद्धे ठरले आहेत.
अण्णा कुठल्या निश्चित वाटेने जाताएत स्वतः किंवा न्यायचं म्हणताएत आपल्याला ? काय
रोड मैप आहे त्यांचा ? त्यात किती स्पष्टता
आणि "सामर्थ्य" आहे आजघडीला ? अण्णा म्हणजे एक प्रश्नं चिन्ह होऊन
बसलेत माझ्या दृष्टीत तरी .
अरविंद केजरी वालान्शिवाय अण्णांच्या मोहिमेला
ना व्हायब्रन्सी, ना चार्म, ना ते एड्ज. हजारो कर्मठ कार्यकर्ते आले, येतील आणि जातील, पण मोहिमेच्या
हाताळणीतलं अनुकूलन घडविण्यासाठी (नावाला नाही पण परिणाम कारकरीत्या झुंजत
राहण्यासाठी) जो व्यापक,अभिनव विचार लागतो तो केजरीवालांकडे दिसतो. यापुढे भ्रष्ट राजकारणी
वर्ग चपापलाच तर तस तो केजरीवालांमुळे होईल..अण्णांमुळे होईल असं मला वाटत नाही.
अण्णांच्या थोर हेतूला, धीरोदात्त वृत्तीला सादर प्रणाम, शुभेच्छा आहेतच..पण आपण तर बुआ वुईथ
अरविंद केजरीवाल, एनीडे !
"मंजिल मिल जायेगी भटकतेही सही.. गुमराह तो वोह है, जो घरसे निकले हि नही!" हे अरविंद केजरी वालान्च्या फेसबुक पेज वर लिहिलेलं जास्त ‘करेक्ट’ वाटतं !
- आशिष अंबादास कुलकर्णी