Wednesday, October 3, 2012

अण्णा हजारे vis a vis अरविंद केजरीवाल !

अण्णांबद्दल पारंपारिक आदर आहेच, पण अरविंद केजरीवालांच्या प्रखरतेसोबत कसं जुळवून घ्यावं हा अण्णान्समोराचा नव्हे तर त्या टीम मधील इतर सगळ्या ज्येष्ठ मंडळींसमोरचा खरा प्रश्नं आहे किंवा मंडळींची असमर्थता आहे असहि म्हणूच शकतो ! अण्णा केजरीवालांशी जोडले गेले आणि तेव्हाच खरे नेशनल हिट ठरले, आताही पुढे केजरीवालान्पासून वेगळे राहिले तर कुठवर मजल मारताएत ते कळेलच. 
अण्णांना व्यक्ती म्हणुन दुय्यम ठरवणे असा हेतू आहे, असा विचार करणे हे खुळेपणाचच ठरेल. बराच काळ अण्णा ह्या लढाईत आपले नेते राहिले आहेत..मार्गदर्शक राहिले आहेत..तसे ते राहतीलच, पण आपल्या नेत्यांच्या मर्यादा लक्षात घेऊनच अनुयायांनी आपल्या स्वतःच्या वागणुकीची, धोरणांची आखणी करायला पाहिजे. याचाच अर्थ उघड आहे की अरविंद केजरीवालांच्या हि काही मर्यादा असतील.. पण त्या आजवर उघडकिला आलेल्या नाहीत, कळल्या नाहीत..किंवा तिथवर, मर्यादेपर्यंत आज वर गोष्टी घडल्या नाहीत. कोणाला काही वाटल्या असतील तर सुस्पष्टपणे कळवाच. अण्णांचं त्यांच्या परीनं जे आजवर चं योगदान आहे ते थोडं नाहीच.. त्याला कोणीही कमी ठरवूच शकत नाही, पण कार्यकर्त्यांमधील वय, मानपान  विसरून जर फक्त मोठ्या आंदोलनांसाठी लागणारी प्रगल्भ हाताळणी, प्रभावी कार्यकर्तेपण म्हणुन यावर जर तौलनिक दृष्ट्या नजर टाकली किंवा काही खूपच बौद्धिक निकष लावले तर  एकूणच बदल घडविण्यासाठी केजरीवाल अधिक सक्षम, अधिक पोटंट, अधिक आशादायी वगैरे वाटतात.

Image Source: http://sim.in.com

शिवाय हल्ली तर बऱ्याचदा केजरीवालांपेक्षा स्वतःला अपोलिटिकल म्हणवणारे, राजकीय पक्ष नको म्हणणारे अण्णाच अधिक राजकीय पद्धतीनं मतं प्रदर्शित करताना दिसतात..आणि त्याला एक विशिष्ट मागच्या पिढीचा अनाक्रमक, अप्रभावी, डिफेन्सिव्ह, बैक फुटेड अप्प्रोच असतो. घटक्यात केजरीवालांवर प्रेम, घटक्यात नाराजी. माझं नाव वापरायचं नाही म्हणायचं.. नंतर म्हणायचं 'मी'च प्रचार करेन. गेल्या काही काळात केजरीवालां इतकं सातत्य स्वतः अण्णांनी दाखवलं आहे ? नसेल तर का नाही. राजकारण असलं म्हणुन मग तलवार म्यानात का करायची? नाकाला फडकं लावल्या सारखं का करायचं? लढाई शी प्रामाणिकता का नाही ठेवायची किंवा अवघड लढाई का नाही घ्यायची अंगावर.. स्वतःच्या प्रकृतीला मानवतील अशा लढाईत का लढायचं ठरवायचं? ज्या मैदानात स्वातंत्र्य हवंय, त्याचं मैदानात लढायला नकोय. छ. शिवाजी महाराष्ट्रातच होऊन गेले की नाही, शिवाजींनी शत्रूला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं की नाही, नव्हे तर तसच द्यावं लागतं, मग हि शिकवण अण्णांनी सेकंडरी का ठरवावी ? खुद्द गांधी हि राजकारणात पडलेच होते की.. मग गांधीवादी अण्णांची हि कसली जगावेगळी वैचारिक लक्झरी ? ..भल्याभल्यांचे विनोदी विचार वाचायला मिळतात, टीव्हीवर पाहायला मिळतात यावर !

एरवीही सगळे टाहो फोडताच असतात, सुस्कारे सोडताच असतात की.. की चांगल्या लोकांनी राजकारणात यायला पाहिजे.. सामाजिक कार्यकर्ते म्हणवणारे तत्वांच्या नावाखाली, निवडणुकीला पैसा कुठून आणायचा इ. इ. कारणं पुढे करून इथं शिस्तीत कच खातात... मग अरविंद केजरीवालांनी हे धैर्य दाखवलं, द्रष्टेपणा दाखविला तर त्यासाठी आदर दाखवायचं सोडून शंका का मिरवायच्या ? मला तर वाटतं, मुळात केजरीवालां मध्ये जितकी 'इनर स्टीम' आहे लढत राहण्याची..जे प्लान्निंग आहे, जेही समोर येईल ते अंगावर घेण्याची समर्पकता आहे, ती आजही संपूर्ण आंदोलनाच्या गर्दीत तितकीच अभावानेच सापडते..ती इतरांमध्ये अनुपस्थित आहे..हे ते इतर दाखवूनही देता आहेत स्वत: हून. ह्या लढाईत केजरीवाल हे निश्चित अधिक कौशल्याचे योद्धे ठरले आहेत.

 अण्णा कुठल्या निश्चित वाटेने जाताएत स्वतः किंवा न्यायचं म्हणताएत आपल्याला ? काय रोड मैप आहे त्यांचा त्यात किती स्पष्टता आणि "सामर्थ्य" आहे आजघडीला ? अण्णा म्हणजे एक प्रश्नं चिन्ह होऊन बसलेत माझ्या दृष्टीत तरी . 

अरविंद केजरी वालान्शिवाय अण्णांच्या मोहिमेला ना व्हायब्रन्सी, ना चार्म, ना ते एड्ज. हजारो कर्मठ कार्यकर्ते आले, येतील आणि जातील, पण मोहिमेच्या हाताळणीतलं अनुकूलन घडविण्यासाठी (नावाला नाही पण परिणाम कारकरीत्या झुंजत राहण्यासाठी) जो व्यापक,अभिनव विचार लागतो तो केजरीवालांकडे दिसतो. यापुढे भ्रष्ट राजकारणी वर्ग चपापलाच तर तस तो केजरीवालांमुळे होईल..अण्णांमुळे होईल असं मला वाटत नाही. अण्णांच्या थोर हेतूला, धीरोदात्त वृत्तीला सादर प्रणाम, शुभेच्छा आहेतच..पण आपण तर बुआ वुईथ अरविंद केजरीवाल, एनीडे ! 

"मंजिल मिल जायेगी भटकतेही सही.. गुमराह तो वोह है, जो घरसे निकले हि नही!" हे अरविंद केजरी वालान्च्या फेसबुक पेज वर लिहिलेलं जास्त करेक्ट वाटतं !  

- आशिष अंबादास कुलकर्णी

Sunday, September 16, 2012

हररोज..


बळजबरी ने लिहिणं ह्याला काही अर्थ नाही..पण अधून मधून लिहायची हुक्की येते..हुक्की नेहमीच यावी वाटते, पण हुक्की वर हुकुम करण्याचा विचार नाही. मनात कितीही, काहीही घोळत असलं तरी, हुक्की येईल तेव्हा येईल ! तेव्हा हि एक हिंदीतून लिहिलेली रचना. कळायला सोपीच. 

--
हररोज .. 
खुदको यूँ इकट्ठा करना, प्रतिबद्धता से धमकाना,   
सोंचना, के अब बहोत हो गया, 
कल नहीं है खुदको 'यूँ' विछिन्नना, 
साये में आना, इश्क़-इश्क़ और फिर रंजित होना l
कुछ और सीखू ना सीखू, 
सीखा है बेहतर ढंगसे, बारीकीसे छितरना, 
और बस, अब अच्छेसे झूठ बोल लेता हूं ll


English Translation à Everyday, I compose myself & (try to) frighten with commitment. Thinking that it’s too much now & tomorrow I won’t let myself disperse/scatter in such a way. I am not confident if I have learned anything through this.
But surely I have learned to scatter myself more finely in a better way and now I can fairly manage to speak a lie (to myself), that’s it ! 
--

Saturday, May 26, 2012

Konte chooputho, Telugu song

It's a Telugu song from film 'Anathapuram 1980'. After seeing this video song and the play between eyes of the two, desire to search meaning of the words was so compelling in order to fully experience what this beautiful song has to offer. Let me know if the English translation of the Telugu lyrics is improper. I would love to correct it. Enjoy! 
  

Click on Images to enlarge

Nenjodu Cherthu, Malyalam Song

I do not understand the language, didn't watch the movie but loved the composition. Easy to recognize that the song is related to the initial exciting phase of love, when the boy and girl have begun to be into each other. Have a nice time!. You may enlarge the video screen to read the English translation of the dialogues in between the song on the video screen & at the end of the song. Below the video are the original lyrics with English translation. 

 

  
Click on Images to enlarge
Credits -  Album : Yuvvh (Malyalam), 2012., Music : Sreejith - Saachin, 
Singer: Aalap Raju, Lyrics : Naveen Maraar

Friday, March 9, 2012

Is India becoming anti-science? - Published Comment

A published comment on The Hindu's editorial article, 'Is India becoming anti-science?' dated December 25, 2011.


Full article: http://www.thehindu.com/opinion/open-page/article2745149.ece

ईश्वरशोध कुसुमाग्रजांचा - प्रकाशित प्रतिक्रिया

'ईश्वरशोध कुसुमाग्रजांचा' ह्या डॉ. घनश्याम बोरकर  ह्यांच्या सुंदर लेखावरील माझी प्रतिक्रिया, लोकसत्ता (लोकरंग) २६ फेब्रुवारी, २०१२. 
 संपूर्ण लेख: http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=212921%3A2012-02-25-17-29-26&catid=104%3A2009-08-05-07-53-42&Itemid=117#.T0n5c2bkd7c.facebook 

ओढ ऑस्करची - प्रकाशित प्रतिक्रिया


'ओढ ऑस्करची' ह्या लेखावरील माझी प्रतिक्रिया, लोकसत्ता - २५ फेब्रुवारी, २०१२ 


What they don't teach you at Indian B-Schools !

A published comment on 'The Hindu' editorial, 'What they don't teach you at Indian B-Schools', March 7, 2012.

Full article: http://www.thehindu.com/opinion/lead/article2967567.ece

Sunday, February 26, 2012

३१ मार्च २०११ ला लिहिलेलं इमेल ..

प्रिय मित्र हरीश पोहेकरला नविन देशात आल्यावर ५ महिने उलटून गेल्या नंतर ३१.३. २०११ ला लिहिलेलं इमेल.

उल्म (जर्मनी) राठ हाउस: शहरातलं मध्यवर्ती ठिकाण
प्रिय हरीश,  कसा  आहेस ? मला माहित आहे तुला वाटलं असेल की काय आशिष कुलकर्णी ... गेल्या नंतर संपर्कात नाही...आणि अजूनही काही वाटले असेल ;).. असो. अरे मी इतका बिझी होतो इथे सुरुवातीला ४-५ महिने ..काय सांगू, साडे चार वर्षांनी पुन्हा अभ्यास,परीक्षा ... एकदम ट्यून ईन व्हायला जरा वेळ पाहिजे.. कोणाच्याच संपर्कात नव्हतो....(पण हरीश ला लिहायचं आहे हे होतं मनात कुठेतरी) आणि चाट मध्ये वैगरे होत नाहीत रे गोष्टी सांगून ...पत्र रे पत्र च !..त्यात जी ताकद ना टी चाट मध्ये कुठे ? ..आता जरा मोकळा आहे ...म्हणालं लिहावं आता हरीशला थोडं विस्तारीत पत्र...तर मला लिहिण्याचे विषय म्हणजे इथले लोक.. आणि अनुभव. तेच सांगतो तर आता..

हा !...माझं म्हणशील ना तर I am humbled after seeing people here from different parts of the world ..नक्की अंदाज येत नाही की कोण किती पाण्यात आहे याचा एकदम ... पण २-४ चायनीज मुलांशी ओळख झालीये... फार फार फार फार मेहनती असतात हि मुलं..! म्हणजे प्रत्येकात एक आक्रमक dragon आहे असं वाटतं मला ! पण एकाच थिंकिंग प्लेन वर आहेत की नाही माहित नाही.. मला मी जिथं आहे तिथून जसं दिसतंय ते सांगतो..चीनच्या आणि भारताच्या शिक्षण पद्धतीत जमीन आसमानाचा फरक आहे .. चीन भारता पेक्षा जवळपास सगळ्यात क्षेत्रात पुढे आहे असा मला फील येतोय.. आपल्या शिक्षण पद्धतीत गंभीर उणीवा आहेत....हे मला वारंवार अनुभवाला येतंय ..

  "मूळ शिक्षणाचा दर्जा हा त्या माणसाच्या वैचारिक आणि त्यायोगे येणाऱ्या कृतीचा आणि पर्यायाने आयुष्याचा दर्जा ठरवत असतं ! गोष्टी जेव्हा 'जग' या पातळीवर येतात ना.. तेव्हा मूळ शिक्षण हीच गोष्ट सगळ्यात मुलभूत ठरते.. हे वाचणं वेगळं आहे .. आणि अनुभवणं वेगळं " 

सध्या चायनीज एकाच गोष्टी मुळे मार खात आहेत की इंग्लिश नीट बोलता येत नाही .. आणि (पाश्चिमात्य) जग चीन ला, कम्युनिस्ट असल्या कारणाने, एन-केन कारणाने एकट पाडायचा विचार करतं (जसं की खोचक पणे गेल्या वर्षी चीन ला शांततेच नोबेल दिलं...Nobel Peace Prize for 2010 to Liu Xiaobo for his long and non-violent struggle for fundamental human rights in China...) आणि चीन कसा जगासाठी फक्त कारखाना आहे आणि भारत म्हणजे कसा दोघात संशोधनासाठी अधिक चांगला देश आहे असं भासवत आहे ...पण असं नाही..हे लोक पुढे आहेत नक्कीच... मी म्हणेन ९९ टक्के भारतीयांना माहित नाहीये चीन काय चीज आहे ते...! भारतीय अजूनही झोपेत आहेत असं मला वाटतं ! Literally all .. all wrong things come up in Democracy...आणि आपल्याकडे तर उच्छाद मांडलाय ... china is single point clear mentality and it shows in their each indivdual कोणा इतर कडून काही नाही पण मी ह्या चीनी विद्यार्थ्यांकडून बरंच काही शिकतोय..! हो पण हे लोक कधी कधी 'एक्स्ट्रा स्मार्ट' असू शकतात ! आणि I am not in the awe of chinese ...I never will be of anything ...but some things are revealed to me which are stunning ..& I know this is not the full picture yet .

Hirschegg (ऑस्ट्रिया) 
जर्मन लोक/विद्यार्थी जर म्हणाले तर एक गोष्ट त्यांच्या मानसिकतेत असल्याचे प्रकर्षाने जाणवते ... utter lack of self disrespect ...किंचितहि न्यून गंड नाही... म्हणुन काही हे लोक मनात जे येईल ते स्पष्ट आणि शुद्ध शब्दात बोलून दाखवतात... दांभिकता तर शोधून सापडत नाही ...जर्मन भाषा जशी खूप logical आहे..तसं ती यांचात तेच उतरवते.. एकूणच हे लोक विचारांच्या दृष्टीने अगदी कमीत कमी ढोंगी, कमी गोंधळलेले, अधिक प्रांजळ , अधिक कृतज्ञ , व्यवस्थित-रोख ठोक, शिस्तबद्ध आणि (कधी कधी अधिक) अभिमानी वाटतात..! म्हणजे इतकं पुरेसं आहे की, जरी कोणी लगेच ..फार थोर वैचारिक पातळीचा नसला तरी ..म्हणजे तशेही इथ नक्कीच असतील, आहेत .. पण तसं दाखवायला ते जात नाहीत ! त्याचा समोरच्याला विचार करण्याचा वेळ / संधी देतात.. ह्यात जास्त मजा आहे ! कसल्याही गोष्टी वर पांघरून घालणे असला प्रकार बिलकुल नाही.. जे आहे ते आहे.. बावळत अजिबात वाटत नाहीत..! मला वाटतं प्रामाणिक पणा आणि स्पष्ट वक्तेपणा, निर्भीडता, चूक असेल तर लगेच माफी मागून दुरुस्त करण्याची तयारी हे प्रमुख गुण..! गुणांशिवाय कोणताही देश किंवा व्यक्ती प्रगती करूच शकत नाही.. आणि प्रत्येक नागरिकात जर हे गुण आहेत तर देश प्रगती केल्या वाचून राहात नाही ..ह्याचे जर्मनी हे सगळ्यात जबरदस्त उदाहरण वाटतं मला ..! .. इतके punctual की यांचा जगणं म्हणजे पण एक world record आहे.. खरंच :) !

तसं बघितलं तर बरंच काही शिकण्या सारखंच आहे ह्या लोकांकडे ..अगदी 'पुरुषा नेही' संडास कसा स्वच्छ ठेवावा पासून आणि संशोधनासाठी दृष्टीकोन कसा असावा पर्यंत ...विशेषत: भारतीय पुरुषांसाठी तरी खूपच उत्तम अनुभव..स्वच्छतेच्या दृष्टीने...आत्तापार्यान्तच्या आलेल्या अनुभवावरून तरी जर्मनी साठी कौतुकच कौतुक आहे माझ्याकडे..! म्हणजे त्यांच्या गाड्या घोड्यांमुळे नाही...पण मुळात ... त्यांचे लोक पाहा कसे आहेत ह्यामुळे ....मी सतत विचार करत असतो की ह्यांचा mind set कसा असेल ते...बाकी आपोआपच सृष्टीच्या विधानानुसार होतं..! ज्याच्याकडे गुण आहेत ..त्याच्या कडे सगळं आहे..! ह्या लोकांच्या राहणीमानाबद्दल सांगायचं तर ..एकदम उच्च आहे रे ..मला तरी फरक वाटला खूप .. हे लोक दररोज नवे ड्रेस आणि चपला बूट घालतात की काय अशी शंका यावी ! पण असं नाही ..ते तेवढं स्वच्छ ठेवतात सगळं ...दिसायला धष्टपुष्ट असतात सगळेच.. आणि भारतात मला कोणीतरी म्हणाल होतं की जर्मन स्त्रिया ह्या पुरुषांप्रमाणेच अन्गापिंडान/चेहऱ्याने असतात .. पण अस काही नाहीये.. काही काही असतात .. विचित्र वाटतात आपल्या नजरेला..पण आता विशेष नाही वाटत ... हा पण बऱ्याच मुली सुंदर असतात दिसायाला ..नितळ गोरे पणा आणि नाकी डोळे नीटस.

सुंदरच जर म्हणल तर दिसायला तुर्कीस्तान च्या मुली देखण्या असतात ! बोलायला पण स्ट्रेट फोरवर्ड..फुकट आढे वेढे नाही..! जर्मन मुलींबद्दल अजून एक गोष्ट म्हणजे , ह्या सर्रास सिगारेटी ओढतात .. म्हणजे माझ्या निरीक्षणानुसार मुलीच जास्त ओढताना दिसतात मुलांपेक्षा .. अजून एक गोष्ट, ही जर्मन लोकान बद्दल नाहीये पण इस्लामी मुलींबद्दल आहे..! इस्लाम मध्ये जर दारू पिणे सिगारेटी ओढणे ह्या गोष्टींसाठी पुरुषालाही मज्जाव आहे .. पण इथे आमच्या वर्गातल्या इराणी मुलीला (टी इस्लामीच असावी) सराईतपणे सिगारेट ओढताना पाहिलंय आणि एक तुर्किश मुलगी आहे ... तिला आमच्या वेलकम रिसेप्शन मध्ये शाम्पेन पिताना पाहिलंय....म्हणजे ह्या मुली नॉर्मल/सरळ वाटतात बोलायला ...आगाऊ असही नाही ... मला ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत .. हे लोक जर कट्टर .. तर ह्या अश्या त्यांच्या धर्मा पलीकडच्या गोष्टी चार चौघात करण्यास कसं काय धजतात.. म्हणजे मी खूप धार्मिक आहे अस नाही पण.. हे लोक स्वताहाला म्हणवतात म्हणुन प्रश्न पडतो ड्युअल वागणुकीचा ! म्हणजे जगात नेमकं चाल्लय तरी काय, असो पुढे मागे त्यांच्याशी संवाद साधता आला तर हा प्रश्न/शंका (टीका म्हणुन नाही) मी विचारणार आहे त्यांना ! बघू काय उत्तर मिळतं ते !

१८ ऑक्टोबर २०१० : क्लास ट्रीप ऑस्ट्रीअन आल्प्स पाहण्यासाठी गेलो असतानाचा 
तुला सांगितलं होतं बहुतेक की .. आम्ही वर्गात १०+ वेगवेगळ्या nationalities आहोत ते.. पण ... मित्र-मैत्रिणी : सध्या फक्त ओळखी होत आहेत...मैत्री वगैरे म्हणजे कितपत होईल आणि कितीक दृढ होईल ह्याबद्दल मला जरा शंकाच आहे..! हि एक गोष्ट जरा अनपेक्षित होती... इथे सगळे मोकळे आहेत तसे .. पण मैत्री साठी जो दिल खुलासपणा (ढिल्लेपणा नाही) असावा लागतो तो अजून कुठे सापडला नाही.. वागण्या बोलण्यात जरा कृत्रिमता आणि मोजून मापून बोलण्याची तऱ्हा आहे ! चूक काहीच नाही..पण मैत्रीच्या दृष्टीने अजून वातावरण तसं ठीकच आहे..! वर्गात ज्या देशातले मुलं जास्त ते आपापसात असतात (चीनी , इराणी).. त्यांना इतरांची गरज नाही... साहजिक आहे..!

मी आणि मागे हिर्शेग्ग (ऑस्ट्रिया) येथील निम-बर्फ़ाच्छादित पर्वत , ऑक्टोबर २०१० 
माझ्यातही बदल होतच आहेत की... पण काय आणि किती लिहावं याला मर्यादा नाहीत.
इथल्या प्रत्येक गोष्टी बद्दल नविन विचार येतात मनात ..त्याची आपल्या इथल्या भौतिक, सामाजिक वातावरणाशी आणि मानासिकतेबरोबर तुलना, हे आजकाल रोजचच होऊन बसलय.. पुन्हा त्यावरची मतं ...चालूच सतत ..... पण तरीही पुन्हा कळवेल तुला सविस्तर..

तुझा मित्र,
आशिष कुलकर्णी

Sunday, January 29, 2012

चित्रपट - जोगवा (२००९) : लल्लाटी भंडारं..!

माझं एक आवडतं गाणं !
चित्रपट : जोगवा (२००९)
संगीत : अजय - अतुल
गीतकार : संजय पाटील
गायक : अजय गोगावले



~~ गाण्याचे शब्द ~~

नदीच्या पल्याड, आईचा डोंगंरं,
डोंगंरं माथ्याला, देवीचं मंदीरं,
घालू जागरं जागरं,डोंगंरं माथ्याला,
हे लल्लाटी भंडारं, दूर लोटून दे अंधारं
आलो दुरून रान्गुन डोंगर येन्गुन उघड देवी दारं ...हे..II धृ. II

नदीच्या पान्यावरं, अंगीनं फुटत,
तुझ्या नजरंच्या तालावरं, काळीजं डुलंतं,
नाद आला गं आला गं, जीवाच्या घुंगराला...II १ II

नवसाला पाव तू देवी माझ्या, हाकला धाव तू,
हाकला धाव तू देवी माझ्या, अंतरी रहाव तू,
देवी माझ्या अंतरी रहाव तू, काम क्रोध अर्पुनी लाव तू
काम क्रोध मर्दुनी लाव तू, देवी माझी पार कर नाव तू ...II २ II

डोळा भरूनं, तुझी मुरतं पाहीनं,
मुरतं पाहीनं, तुझं महिमा गाईन,
महिमा गाईन, तुला घुंगऱ्या वाहीनं,
घुंगऱ्या वाहीन, तुझा भंडारा खाईन,
दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला....II ३ II

यल्लमा देवी चा जागर ह्यो, भक्ती चा सागर
निविदाची ची भाकर दावती हि गं, जमल्या गं लेकर
पुनवेचा चांदवा, देवी चा मायेचा पाझर
आई च्या मायेचा पाझर, सागर ह्यो, भक्तीचा सागर...II ४ II

खना नारळाने तुझी, ओटी मी भरीन
ओटी मी भरीन, तुझी सेवा करीन
सेवा करीन, तुझा देव्हारा धरीन
देव्हारा धरीन, माझी ओंजळ भरेन
आई सांभाळ सांभाळ, कुशीतं लेकराला ...II ५ II