'ओढ ऑस्करची' ह्या लेखावरील माझी प्रतिक्रिया, लोकसत्ता - २५ फेब्रुवारी, २०१२
या ब्लॉग वर व्यक्त केलेली सगळी मतं आणि दृष्टीकोन हि श्रीयुत आशिष अंबादास कुलकर्णी यांची वैयक्तिक मतं आहेत, आणि ते, या ब्लॉगवर ज्या ज्या ठिकाणी Private Content असे Label केले आहे त्या मालमत्तेवर स्वतः चे बौद्धिक आणि नैतिक सर्वाधिकार जाहीर करतात.©सर्व हक्क सुरक्षित. All the opinions and views expressed on this blog are personal of Mr. Ashish Ambadas Kulkarni and he asserts his sole intellectual and moral right towards the content wherever labeled as Private Content. ©All Rights Reserved.
Friday, March 9, 2012
What they don't teach you at Indian B-Schools !
A published comment on 'The Hindu' editorial, 'What they don't teach you at Indian B-Schools', March 7, 2012.
Full article: http://www.thehindu.com/opinion/lead/article2967567.ece
Full article: http://www.thehindu.com/opinion/lead/article2967567.ece
Sunday, February 26, 2012
३१ मार्च २०११ ला लिहिलेलं इमेल ..
प्रिय मित्र हरीश पोहेकरला नविन देशात आल्यावर ५ महिने उलटून गेल्या नंतर ३१.३. २०११ ला लिहिलेलं इमेल.
हा !...माझं म्हणशील ना तर I am humbled after seeing people here from different parts of the world ..नक्की अंदाज येत नाही की कोण किती पाण्यात आहे याचा एकदम ... पण २-४ चायनीज मुलांशी ओळख झालीये... फार फार फार फार मेहनती असतात हि मुलं..! म्हणजे प्रत्येकात एक आक्रमक dragon आहे असं वाटतं मला ! पण एकाच थिंकिंग प्लेन वर आहेत की नाही माहित नाही.. मला मी जिथं आहे तिथून जसं दिसतंय ते सांगतो..चीनच्या आणि भारताच्या शिक्षण पद्धतीत जमीन आसमानाचा फरक आहे .. चीन भारता पेक्षा जवळपास सगळ्यात क्षेत्रात पुढे आहे असा मला फील येतोय.. आपल्या शिक्षण पद्धतीत गंभीर उणीवा आहेत....हे मला वारंवार अनुभवाला येतंय ..
"मूळ शिक्षणाचा दर्जा हा त्या माणसाच्या वैचारिक आणि त्यायोगे येणाऱ्या कृतीचा आणि पर्यायाने आयुष्याचा दर्जा ठरवत असतं ! गोष्टी जेव्हा 'जग' या पातळीवर येतात ना.. तेव्हा मूळ शिक्षण हीच गोष्ट सगळ्यात मुलभूत ठरते.. हे वाचणं वेगळं आहे .. आणि अनुभवणं वेगळं "
सध्या चायनीज एकाच गोष्टी मुळे मार खात आहेत की इंग्लिश नीट बोलता येत नाही .. आणि (पाश्चिमात्य) जग चीन ला, कम्युनिस्ट असल्या कारणाने, एन-केन कारणाने एकट पाडायचा विचार करतं (जसं की खोचक पणे गेल्या वर्षी चीन ला शांततेच नोबेल दिलं...Nobel Peace Prize for 2010 to Liu Xiaobo for his long and non-violent struggle for fundamental human rights in China...) आणि चीन कसा जगासाठी फक्त कारखाना आहे आणि भारत म्हणजे कसा दोघात संशोधनासाठी अधिक चांगला देश आहे असं भासवत आहे ...पण असं नाही..हे लोक पुढे आहेत नक्कीच... मी म्हणेन ९९ टक्के भारतीयांना माहित नाहीये चीन काय चीज आहे ते...! भारतीय अजूनही झोपेत आहेत असं मला वाटतं ! Literally all .. all wrong things come up in Democracy...आणि आपल्याकडे तर उच्छाद मांडलाय ... china is single point clear mentality and it shows in their each indivdual कोणा इतर कडून काही नाही पण मी ह्या चीनी विद्यार्थ्यांकडून बरंच काही शिकतोय..! हो पण हे लोक कधी कधी 'एक्स्ट्रा स्मार्ट' असू शकतात ! आणि I am not in the awe of chinese ...I never will be of anything ...but some things are revealed to me which are stunning ..& I know this is not the full picture yet .
तसं बघितलं तर बरंच काही शिकण्या सारखंच आहे ह्या लोकांकडे ..अगदी 'पुरुषा नेही' संडास कसा स्वच्छ ठेवावा पासून आणि संशोधनासाठी दृष्टीकोन कसा असावा पर्यंत ...विशेषत: भारतीय पुरुषांसाठी तरी खूपच उत्तम अनुभव..स्वच्छतेच्या दृष्टीने...आत्तापार्यान्तच्या आलेल्या अनुभवावरून तरी जर्मनी साठी कौतुकच कौतुक आहे माझ्याकडे..! म्हणजे त्यांच्या गाड्या घोड्यांमुळे नाही...पण मुळात ... त्यांचे लोक पाहा कसे आहेत ह्यामुळे ....मी सतत विचार करत असतो की ह्यांचा mind set कसा असेल ते...बाकी आपोआपच सृष्टीच्या विधानानुसार होतं..! ज्याच्याकडे गुण आहेत ..त्याच्या कडे सगळं आहे..! ह्या लोकांच्या राहणीमानाबद्दल सांगायचं तर ..एकदम उच्च आहे रे ..मला तरी फरक वाटला खूप .. हे लोक दररोज नवे ड्रेस आणि चपला बूट घालतात की काय अशी शंका यावी ! पण असं नाही ..ते तेवढं स्वच्छ ठेवतात सगळं ...दिसायला धष्टपुष्ट असतात सगळेच.. आणि भारतात मला कोणीतरी म्हणाल होतं की जर्मन स्त्रिया ह्या पुरुषांप्रमाणेच अन्गापिंडान/चेहऱ्याने असतात .. पण अस काही नाहीये.. काही काही असतात .. विचित्र वाटतात आपल्या नजरेला..पण आता विशेष नाही वाटत ... हा पण बऱ्याच मुली सुंदर असतात दिसायाला ..नितळ गोरे पणा आणि नाकी डोळे नीटस.
सुंदरच जर म्हणल तर दिसायला तुर्कीस्तान च्या मुली देखण्या असतात ! बोलायला पण स्ट्रेट फोरवर्ड..फुकट आढे वेढे नाही..! जर्मन मुलींबद्दल अजून एक गोष्ट म्हणजे , ह्या सर्रास सिगारेटी ओढतात .. म्हणजे माझ्या निरीक्षणानुसार मुलीच जास्त ओढताना दिसतात मुलांपेक्षा .. अजून एक गोष्ट, ही जर्मन लोकान बद्दल नाहीये पण इस्लामी मुलींबद्दल आहे..! इस्लाम मध्ये जर दारू पिणे सिगारेटी ओढणे ह्या गोष्टींसाठी पुरुषालाही मज्जाव आहे .. पण इथे आमच्या वर्गातल्या इराणी मुलीला (टी इस्लामीच असावी) सराईतपणे सिगारेट ओढताना पाहिलंय आणि एक तुर्किश मुलगी आहे ... तिला आमच्या वेलकम रिसेप्शन मध्ये शाम्पेन पिताना पाहिलंय....म्हणजे ह्या मुली नॉर्मल/सरळ वाटतात बोलायला ...आगाऊ असही नाही ... मला ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत .. हे लोक जर कट्टर .. तर ह्या अश्या त्यांच्या धर्मा पलीकडच्या गोष्टी चार चौघात करण्यास कसं काय धजतात.. म्हणजे मी खूप धार्मिक आहे अस नाही पण.. हे लोक स्वताहाला म्हणवतात म्हणुन प्रश्न पडतो ड्युअल वागणुकीचा ! म्हणजे जगात नेमकं चाल्लय तरी काय, असो पुढे मागे त्यांच्याशी संवाद साधता आला तर हा प्रश्न/शंका (टीका म्हणुन नाही) मी विचारणार आहे त्यांना ! बघू काय उत्तर मिळतं ते !
तुला सांगितलं होतं बहुतेक की .. आम्ही वर्गात १०+ वेगवेगळ्या nationalities आहोत ते.. पण ...
मित्र-मैत्रिणी : सध्या फक्त ओळखी होत आहेत...मैत्री वगैरे म्हणजे कितपत होईल आणि कितीक दृढ होईल ह्याबद्दल मला जरा शंकाच आहे..! हि एक गोष्ट जरा अनपेक्षित होती... इथे सगळे मोकळे आहेत तसे .. पण मैत्री साठी जो दिल खुलासपणा (ढिल्लेपणा नाही) असावा लागतो तो अजून कुठे सापडला नाही.. वागण्या बोलण्यात जरा कृत्रिमता आणि मोजून मापून बोलण्याची तऱ्हा आहे ! चूक काहीच नाही..पण मैत्रीच्या दृष्टीने अजून वातावरण तसं ठीकच आहे..! वर्गात ज्या देशातले मुलं जास्त ते आपापसात असतात (चीनी , इराणी).. त्यांना इतरांची गरज नाही... साहजिक आहे..!
माझ्यातही बदल होतच आहेत की... पण काय आणि किती लिहावं याला मर्यादा नाहीत.
इथल्या प्रत्येक गोष्टी बद्दल नविन विचार येतात मनात ..त्याची आपल्या इथल्या भौतिक, सामाजिक वातावरणाशी आणि मानासिकतेबरोबर तुलना, हे आजकाल रोजचच होऊन बसलय.. पुन्हा त्यावरची मतं ...चालूच सतत ..... पण तरीही पुन्हा कळवेल तुला सविस्तर..
तुझा मित्र,
आशिष कुलकर्णी
| उल्म (जर्मनी) राठ हाउस: शहरातलं मध्यवर्ती ठिकाण |
प्रिय हरीश,
कसा आहेस ? मला माहित आहे तुला वाटलं असेल की काय आशिष कुलकर्णी ... गेल्या नंतर संपर्कात नाही...आणि अजूनही काही वाटले असेल ;).. असो. अरे मी इतका बिझी होतो इथे सुरुवातीला ४-५ महिने ..काय सांगू, साडे चार वर्षांनी पुन्हा अभ्यास,परीक्षा ... एकदम ट्यून ईन व्हायला जरा वेळ पाहिजे.. कोणाच्याच संपर्कात नव्हतो....(पण हरीश ला लिहायचं आहे हे होतं मनात कुठेतरी) आणि चाट मध्ये वैगरे होत नाहीत रे गोष्टी सांगून ...पत्र रे पत्र च !..त्यात जी ताकद ना टी चाट मध्ये कुठे ? ..आता जरा मोकळा आहे ...म्हणालं लिहावं आता हरीशला थोडं विस्तारीत पत्र...तर मला लिहिण्याचे विषय म्हणजे इथले लोक.. आणि अनुभव. तेच सांगतो तर आता..
हा !...माझं म्हणशील ना तर I am humbled after seeing people here from different parts of the world ..नक्की अंदाज येत नाही की कोण किती पाण्यात आहे याचा एकदम ... पण २-४ चायनीज मुलांशी ओळख झालीये... फार फार फार फार मेहनती असतात हि मुलं..! म्हणजे प्रत्येकात एक आक्रमक dragon आहे असं वाटतं मला ! पण एकाच थिंकिंग प्लेन वर आहेत की नाही माहित नाही.. मला मी जिथं आहे तिथून जसं दिसतंय ते सांगतो..चीनच्या आणि भारताच्या शिक्षण पद्धतीत जमीन आसमानाचा फरक आहे .. चीन भारता पेक्षा जवळपास सगळ्यात क्षेत्रात पुढे आहे असा मला फील येतोय.. आपल्या शिक्षण पद्धतीत गंभीर उणीवा आहेत....हे मला वारंवार अनुभवाला येतंय ..
"मूळ शिक्षणाचा दर्जा हा त्या माणसाच्या वैचारिक आणि त्यायोगे येणाऱ्या कृतीचा आणि पर्यायाने आयुष्याचा दर्जा ठरवत असतं ! गोष्टी जेव्हा 'जग' या पातळीवर येतात ना.. तेव्हा मूळ शिक्षण हीच गोष्ट सगळ्यात मुलभूत ठरते.. हे वाचणं वेगळं आहे .. आणि अनुभवणं वेगळं "
सध्या चायनीज एकाच गोष्टी मुळे मार खात आहेत की इंग्लिश नीट बोलता येत नाही .. आणि (पाश्चिमात्य) जग चीन ला, कम्युनिस्ट असल्या कारणाने, एन-केन कारणाने एकट पाडायचा विचार करतं (जसं की खोचक पणे गेल्या वर्षी चीन ला शांततेच नोबेल दिलं...Nobel Peace Prize for 2010 to Liu Xiaobo for his long and non-violent struggle for fundamental human rights in China...) आणि चीन कसा जगासाठी फक्त कारखाना आहे आणि भारत म्हणजे कसा दोघात संशोधनासाठी अधिक चांगला देश आहे असं भासवत आहे ...पण असं नाही..हे लोक पुढे आहेत नक्कीच... मी म्हणेन ९९ टक्के भारतीयांना माहित नाहीये चीन काय चीज आहे ते...! भारतीय अजूनही झोपेत आहेत असं मला वाटतं ! Literally all .. all wrong things come up in Democracy...आणि आपल्याकडे तर उच्छाद मांडलाय ... china is single point clear mentality and it shows in their each indivdual कोणा इतर कडून काही नाही पण मी ह्या चीनी विद्यार्थ्यांकडून बरंच काही शिकतोय..! हो पण हे लोक कधी कधी 'एक्स्ट्रा स्मार्ट' असू शकतात ! आणि I am not in the awe of chinese ...I never will be of anything ...but some things are revealed to me which are stunning ..& I know this is not the full picture yet .
![]() |
| Hirschegg (ऑस्ट्रिया) |
जर्मन लोक/विद्यार्थी जर म्हणाले तर एक गोष्ट त्यांच्या मानसिकतेत असल्याचे प्रकर्षाने जाणवते ... utter lack of self disrespect ...किंचितहि न्यून गंड नाही... म्हणुन काही हे लोक मनात जे येईल ते स्पष्ट आणि शुद्ध शब्दात बोलून दाखवतात... दांभिकता तर शोधून सापडत नाही ...जर्मन भाषा जशी खूप logical आहे..तसं ती यांचात तेच उतरवते..
एकूणच हे लोक विचारांच्या दृष्टीने अगदी कमीत कमी ढोंगी, कमी गोंधळलेले, अधिक प्रांजळ , अधिक कृतज्ञ , व्यवस्थित-रोख ठोक, शिस्तबद्ध आणि (कधी कधी अधिक) अभिमानी वाटतात..! म्हणजे इतकं पुरेसं आहे की, जरी कोणी लगेच ..फार थोर वैचारिक पातळीचा नसला तरी ..म्हणजे तशेही इथ नक्कीच असतील, आहेत .. पण तसं दाखवायला ते जात नाहीत ! त्याचा समोरच्याला विचार करण्याचा वेळ / संधी देतात.. ह्यात जास्त मजा आहे ! कसल्याही गोष्टी वर पांघरून घालणे असला प्रकार बिलकुल नाही.. जे आहे ते आहे.. बावळत अजिबात वाटत नाहीत..! मला वाटतं प्रामाणिक पणा आणि स्पष्ट वक्तेपणा, निर्भीडता, चूक असेल तर लगेच माफी मागून दुरुस्त करण्याची तयारी हे प्रमुख गुण..! गुणांशिवाय कोणताही देश किंवा व्यक्ती प्रगती करूच शकत नाही.. आणि प्रत्येक नागरिकात जर हे गुण आहेत तर देश प्रगती केल्या वाचून राहात नाही ..ह्याचे जर्मनी हे सगळ्यात जबरदस्त उदाहरण वाटतं मला ..! .. इतके punctual की यांचा जगणं म्हणजे पण एक world record आहे.. खरंच :) !
तसं बघितलं तर बरंच काही शिकण्या सारखंच आहे ह्या लोकांकडे ..अगदी 'पुरुषा नेही' संडास कसा स्वच्छ ठेवावा पासून आणि संशोधनासाठी दृष्टीकोन कसा असावा पर्यंत ...विशेषत: भारतीय पुरुषांसाठी तरी खूपच उत्तम अनुभव..स्वच्छतेच्या दृष्टीने...आत्तापार्यान्तच्या आलेल्या अनुभवावरून तरी जर्मनी साठी कौतुकच कौतुक आहे माझ्याकडे..! म्हणजे त्यांच्या गाड्या घोड्यांमुळे नाही...पण मुळात ... त्यांचे लोक पाहा कसे आहेत ह्यामुळे ....मी सतत विचार करत असतो की ह्यांचा mind set कसा असेल ते...बाकी आपोआपच सृष्टीच्या विधानानुसार होतं..! ज्याच्याकडे गुण आहेत ..त्याच्या कडे सगळं आहे..! ह्या लोकांच्या राहणीमानाबद्दल सांगायचं तर ..एकदम उच्च आहे रे ..मला तरी फरक वाटला खूप .. हे लोक दररोज नवे ड्रेस आणि चपला बूट घालतात की काय अशी शंका यावी ! पण असं नाही ..ते तेवढं स्वच्छ ठेवतात सगळं ...दिसायला धष्टपुष्ट असतात सगळेच.. आणि भारतात मला कोणीतरी म्हणाल होतं की जर्मन स्त्रिया ह्या पुरुषांप्रमाणेच अन्गापिंडान/चेहऱ्याने असतात .. पण अस काही नाहीये.. काही काही असतात .. विचित्र वाटतात आपल्या नजरेला..पण आता विशेष नाही वाटत ... हा पण बऱ्याच मुली सुंदर असतात दिसायाला ..नितळ गोरे पणा आणि नाकी डोळे नीटस.
सुंदरच जर म्हणल तर दिसायला तुर्कीस्तान च्या मुली देखण्या असतात ! बोलायला पण स्ट्रेट फोरवर्ड..फुकट आढे वेढे नाही..! जर्मन मुलींबद्दल अजून एक गोष्ट म्हणजे , ह्या सर्रास सिगारेटी ओढतात .. म्हणजे माझ्या निरीक्षणानुसार मुलीच जास्त ओढताना दिसतात मुलांपेक्षा .. अजून एक गोष्ट, ही जर्मन लोकान बद्दल नाहीये पण इस्लामी मुलींबद्दल आहे..! इस्लाम मध्ये जर दारू पिणे सिगारेटी ओढणे ह्या गोष्टींसाठी पुरुषालाही मज्जाव आहे .. पण इथे आमच्या वर्गातल्या इराणी मुलीला (टी इस्लामीच असावी) सराईतपणे सिगारेट ओढताना पाहिलंय आणि एक तुर्किश मुलगी आहे ... तिला आमच्या वेलकम रिसेप्शन मध्ये शाम्पेन पिताना पाहिलंय....म्हणजे ह्या मुली नॉर्मल/सरळ वाटतात बोलायला ...आगाऊ असही नाही ... मला ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत .. हे लोक जर कट्टर .. तर ह्या अश्या त्यांच्या धर्मा पलीकडच्या गोष्टी चार चौघात करण्यास कसं काय धजतात.. म्हणजे मी खूप धार्मिक आहे अस नाही पण.. हे लोक स्वताहाला म्हणवतात म्हणुन प्रश्न पडतो ड्युअल वागणुकीचा ! म्हणजे जगात नेमकं चाल्लय तरी काय, असो पुढे मागे त्यांच्याशी संवाद साधता आला तर हा प्रश्न/शंका (टीका म्हणुन नाही) मी विचारणार आहे त्यांना ! बघू काय उत्तर मिळतं ते !
![]() |
| १८ ऑक्टोबर २०१० : क्लास ट्रीप ऑस्ट्रीअन आल्प्स पाहण्यासाठी गेलो असतानाचा |
| मी आणि मागे हिर्शेग्ग (ऑस्ट्रिया) येथील निम-बर्फ़ाच्छादित पर्वत , ऑक्टोबर २०१० |
इथल्या प्रत्येक गोष्टी बद्दल नविन विचार येतात मनात ..त्याची आपल्या इथल्या भौतिक, सामाजिक वातावरणाशी आणि मानासिकतेबरोबर तुलना, हे आजकाल रोजचच होऊन बसलय.. पुन्हा त्यावरची मतं ...चालूच सतत ..... पण तरीही पुन्हा कळवेल तुला सविस्तर..
तुझा मित्र,
आशिष कुलकर्णी
Sunday, January 29, 2012
चित्रपट - जोगवा (२००९) : लल्लाटी भंडारं..!
माझं एक आवडतं गाणं !
चित्रपट : जोगवा (२००९)
संगीत : अजय - अतुल
गीतकार : संजय पाटील
गायक : अजय गोगावले
चित्रपट : जोगवा (२००९)
संगीत : अजय - अतुल
गीतकार : संजय पाटील
गायक : अजय गोगावले
~~ गाण्याचे शब्द ~~
नदीच्या पल्याड, आईचा डोंगंरं,
डोंगंरं माथ्याला, देवीचं मंदीरं,
घालू जागरं जागरं,डोंगंरं माथ्याला,
हे लल्लाटी भंडारं, दूर लोटून दे अंधारं
आलो दुरून रान्गुन डोंगर येन्गुन उघड देवी दारं ...हे..II धृ. II
नदीच्या पान्यावरं, अंगीनं फुटत,
तुझ्या नजरंच्या तालावरं, काळीजं डुलंतं,
नाद आला गं आला गं, जीवाच्या घुंगराला...II १ II
नवसाला पाव तू देवी माझ्या, हाकला धाव तू,
हाकला धाव तू देवी माझ्या, अंतरी रहाव तू,
देवी माझ्या अंतरी रहाव तू, काम क्रोध अर्पुनी लाव तू
काम क्रोध मर्दुनी लाव तू, देवी माझी पार कर नाव तू ...II २ II
डोळा भरूनं, तुझी मुरतं पाहीनं,
मुरतं पाहीनं, तुझं महिमा गाईन,
महिमा गाईन, तुला घुंगऱ्या वाहीनं,
घुंगऱ्या वाहीन, तुझा भंडारा खाईन,
दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला....II ३ II
यल्लमा देवी चा जागर ह्यो, भक्ती चा सागर
निविदाची ची भाकर दावती हि गं, जमल्या गं लेकर
पुनवेचा चांदवा, देवी चा मायेचा पाझर
आई च्या मायेचा पाझर, सागर ह्यो, भक्तीचा सागर...II ४ II
खना नारळाने तुझी, ओटी मी भरीन
ओटी मी भरीन, तुझी सेवा करीन
सेवा करीन, तुझा देव्हारा धरीन
देव्हारा धरीन, माझी ओंजळ भरेन
आई सांभाळ सांभाळ, कुशीतं लेकराला ...II ५ II
Thursday, December 22, 2011
फेस–बुक –चीड–चीड
नेमकं हातात पेन घेऊन लिहायला बसलं की उडाले विचार आणि पुन्हा त्याचं विचारांचा पाठलाग करायचा म्हणजे अंधारात पत्ते शोधण्यासारखं आहे. काडी एकदा जशी पेटते ना तशी ती पुन्हा कधीच पेटत नाही, नंतर दुसरीच काडी पेटते विचारांचं तसच आहे तर विचारांना सुरुवात फेसबुक वर 'कुलकर्णी' ग्रूप वर (कदाचित उपयुक्त) टीका ह्यातून झाली. तर, हि कम्युनिटी कशाला सुरु केलीये देवजाणे ! पण अगदी निर्हेतुक वाटते, नव्हे आहेच. उगाच चार ठिकाणचे तेच ते विनोद/ लेख उत्स्फूर्त पणे 'पेस्ट' करण्यात काय तथ्य आहे ? कोणता उदात्त हेतू साध्य होतोय अशानी?
फेसबुक हे एक आधुनिक तंत्र-ज्ञान असले तरी त्याची उपयुक्तता हे दुय्यम दर्जाच्या वेब रंजनासाठीच होताना दिसतेय. आपण खरंच काहीतरी दर्जेदार पद्धतीने अशा ग्रुप्स चा उपयोग करावा हे कोणाच्या गावातही नाही वाटतं. बरं म्हणावं तर लोक एवढं मोकळं हि लिहित नाहीत. विज्ञान, साहित्य, कला यावर भाष्य करणे किंवा अजूनही कुठला चांगला उपयोग करणे..कुठाय सगळं ? का नाही करू शकत ? कॉम्पुटर ऑपरेट करू शकणारे लोक इतके मागास असू शकतात ? निदान एखाद्या गोष्टीवर प्रामाणिक पणे मतं तरी नोंदवतात का कोणी ? उगाच चार चौघांच्या 'प्रोफाईल' वर टिचक्या मारत बसायचं. आधी लोक गावभर उन्डरणे याला टुकार-पणा, आवारागर्दी म्हणायचे आता एका जागी बसूनही हे शक्य करून दिलंय फेसबुकनी या २१ व्या शतकात. फेसबुक वरच प्रत्येक पेज हे जनसामान्यांसाठी एक प्रकारे 'पेज ३' होऊन बसलंय. हे असले विचार उद्विग्न करतात मनाला आणि तिसऱ्या सेकंदाला हा ग्रूप अनजॉईन करावा आणि विंडो बंद करून टाकावी असं उत्कटतेने वाटते.
अर्थ शोधायचा नाहीये का कोणाला ? किंवा नसेल तर निर्माण करायचा ? शुद्ध मंदपणा नाहीये का हा ? सकारात्मक म्हणालं तर फेसबुक मुळे लोकं जरा जवळ आली आणि लोक जवळ आले की वेग वेगळ्या प्रचंड शक्यता निर्माण होऊ शकतात.. बरं आता जरा जवळ आलोत पण पुढे काय ?? काहीच होताना दिसत नाहीये..राज्य क्रांत्यांशिवाय !
(दिनांक-२७/४/११)

Sunday, December 18, 2011
लिहिणं आणि बोलणं
माणूस निश्चतपणे आधी बोलायला शिकला आणि नंतर लिहायला. लिहिणं हि याचाच अर्थ उन्नत अवस्था आहे. संशोधनाच्या दृष्टीकोनातून..म्हणजे अधिक उन्नत होण्याच्या गरजेतून .. ह्या दोन्ही मुलभूत क्षमतांच अतिसंक्षिप्त मूल्य मापन इथं करण्याचा प्रयत्न. लिहिताना जे लिहायचं आहे त्याबद्दल मेंदूला विचार करायला अधिक वेळ मिळतो, कारण लिहिताना आपण विचार करू शकतो. "बोलताना" तसंच नसतं, बोलणारा बोलूच शकतो, बोलताना सोबत विचारहि करणं म्हणजे (महा) कठीण ..आणि लिहिण्यापेक्षा बोलणं लवकर संपतं त्यामुळे केला विचार बोलताना तर त्यासाठीही वेळ मिळतो तो कमीच. शिवाय, बोलताना समोर कोणीतरी असावं लागतं 'नुसतं बोलतो' हे काही समाजात बुद्धीवादाचे प्रतीक मानले जात नाही, की वाह दररोज ४-६ तास एकटाच बोल-साधनेत मग्न असतात वगैरे..लिहिताना कसं, एकट्यानेच बसू शकतो (नव्हे लागतं) तासन तास ..दिवसेंदिवस आणि समोर कोणी असावं लागतं नाही.. (नकोच कोणी खरं तर) ..असं लिहित बसण्याला 'लेखन साधना' वगैरे गोंडस, प्रतिष्ठित नावं हि प्राप्त होतात.. कोणासमोर बोलायचं म्हणजे फार काळजी घ्यावी लागते, इच्छा नसली तरी. समोरच्याला जरा शिव्याशाप द्यायची सोय नाही, नाही तर तो कायमचा पळालाच समजा. त्याच्या/तिच्या बाजूने घ्याव लागतं यात आपली मूळ भावव्यक्तता बदलू शकते, अर्थात हे व्यक्तीवर अवलंबून आहे पण भावना 'modulate' होते, 'sophisticate' होते एवढं तर मी म्हणूच शकतो..कितपत होते हा भाग वेगळा..
लिहिताना किंवा वाचताना जेव्हढे बारकावे लक्षात येतात तेव्हढे बोलताना आणि ऐकताना लक्षात येतात का ?..बोललेलं विरून जातं हवेत..बोलणाऱ्याला सुद्धा ते आठवणार नाही एखाद्यावेळेस की आपण काय बोललो ते..लिहिलेलं कागदावर टिकून राहतं...शिवाय प्रत्येक वेळेस वाचल्यावर वेगळं नव्याने काहीतरी समजत असतं. ऐकणं बहुतेकवेळा एकदाच होतं ! लिहिणं आणि वाचणं हे बोलणं आणि ऐकण्यापेक्षा निर्विवादपणे जास्त उपयुक्त आहे संशोधनासाठी..लिहिणं वाचणं हे एकट्याने साध्य आहे..त्यामुळे ते स्वतःच जास्त पूर्ण हि आहे !
लिहिलेलं वाचन करणारा म्हणजे म्हणजे वाचणे हि वाचणाऱ्याचीच खाज असते अखेर, लिहिणारा हे जाणून लिहू शकतो, त्यात वाचकाला शिव्या जरी हाणल्या असतील तरी तेव्हा लिहिणारा मात्र तेव्हा समोर नसतो.. ह्या शिव्या खाणं हा खरंतर वाचणाऱ्याचाच choice असतो . ऐकणं हे तेव्हढ सक्तीचं नाही..ऐकणारा काही गोष्टी लागलीच फेटाळून लावू शकतो… वाचताना त्या वाचाव्याच लागतात आणि काही काळ तरी त्या तशाच राहतात.या शिव्या शापाखेरीज..वाचन म्हणजे समोरच्याचे विचार त्याच्याच शब्दातून पाहणं .. त्याला लिहिताना मनात जे आहे ते जास्त तसच्या तसं ..modulate fodulate न होता उतरवता येतं..व्यक्तशुद्धतेचे महत्वाचे,अधिक गुण लिहिण्याला बोलण्यापेक्षा. लिहिणं हे बोलण्यापेक्षा जरा अधिक बिनधास्तच! एका संस्कृत सुभाषिताप्रमाणे आपले मुख म्हणजे अज्ञानाचे द्वार आहे आणि गांधी म्हणून गेलेत की मौनात प्रचंड सामर्थ्य आहे..तेव्हा निष्कर्ष म्हणुन आपण असं म्हणू या क की अधिक उन्नत व्हायचं असेल मानवाला तर त्यांनी त्याचं तोंड जरा बंद ठेवलेलाच बरं ?
![]() |
| Image Source: http://lauraberry.wordpress.com/ |

Saturday, March 19, 2011
" विदे - शी "
हा..!...तर इथे (उल्म, जर्मनी ) येऊनही मी माझ्या भारतीय पद्धती विसरू शकत नाही याचे अगदी महत्वाचे आणि रोजचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे माझी शी करण्याची पद्धत ..इथे कमोड पद्धती आहे...नुसती पुसा पुशी जी माझ्या भारतीय मनाला आणि शरीराला रुचत नाही... कितीही पुसलं तरी "स्वच्छ नाही झालं वाटतं" ही साशंकता शिवाय नंतरवास येईन की काय ही त्याहून मोठी भीती ...आणि पादलो बिदलो कधी तर "चड्डी थोडी खराब झाली असेल" हे कुतूहल .. असो, माझ्या एकट्यासाठी कोणी भारतीय शैलीचा संडास इथे बांधणार नाही...! त्यामुळे ती अपेक्षा करणं व्यर्थ आहे....शिवाय भारतीय पद्धतच म्हणालं तर .. बाहेर जाऊन करावं म्हणलं तर... थंडी इतकी की बाहेर कुठे टमरेल घेऊन जाणे हे म्हणजे शाप दिल्याप्रमाणे ...हाता पायाला जिथे थंडी सोसवतहोत नाही तिथे अशी कामे करून नसती रिस्क कशाला घ्या ..जरी घ्यायची म्हणलं आणिथंडीमुळे शी बाहेर येतानाच गोठली तर ?? देवा देवा ! त्यामुळे ह्या महत्वाच्या प्रश्नावर मात करण्यासाठी मी दीड लिटर ची एक (कोल्ड्रिंक ची) बाटली नळाला येणाऱ्या गरम पाण्याने पुरेपूर भरून घेऊन संडासातच जातो.. आणि कमोड वरच भारतीय पद्धतीने बसतो..आणि आरामात कार्यक्रम उरकतो....कसलाही त्रास नाही... काही वेगळं पण वाटत नाही.. भारतीय फीलच असतो..फक्त तोल जरा सांभाळावा लागतो..! शी ला जाताना ".... फिर भी दिल है हिंदुस्तानी " हे गाणं आठवत..! :) इथल्याकमोड चे डिझाईन पण जरा चांगले म्हणावे म्हणजे त्यातील पाण्यात जरी शी वेगाने प्रवेश करती झाली तरी वापस तेच पाणी चिडून पायावर येत नाही .. जर्मन डिझाईन चे आभार ! मुंबईला कंपनी मध्ये असा प्रयोग एकदा करून पाहिला होता तेव्हा शी च landing कमोडच्या उतारी भागावर मुद्दाम मोठ्या प्रयत्नाने करावं लागायच जेणेकरून खालचे तीर्थ अंगावर उडू नये.. पण घडायचं उलट .. ह्याचा मनोमन राग आला तरी गरज आपलीच म्हणुन पर्याय नसायचा ...त्यामुळे मुंबईतल्या कमोड डिझाईन चा धिक्कार असो !
Subscribe to:
Posts (Atom)