माणूस निश्चतपणे आधी बोलायला शिकला आणि नंतर लिहायला. लिहिणं हि याचाच अर्थ उन्नत अवस्था आहे. संशोधनाच्या दृष्टीकोनातून..म्हणजे अधिक उन्नत होण्याच्या गरजेतून .. ह्या दोन्ही मुलभूत क्षमतांच अतिसंक्षिप्त मूल्य मापन इथं करण्याचा प्रयत्न. लिहिताना जे लिहायचं आहे त्याबद्दल मेंदूला विचार करायला अधिक वेळ मिळतो, कारण लिहिताना आपण विचार करू शकतो. "बोलताना" तसंच नसतं, बोलणारा बोलूच शकतो, बोलताना सोबत विचारहि करणं म्हणजे (महा) कठीण ..आणि लिहिण्यापेक्षा बोलणं लवकर संपतं त्यामुळे केला विचार बोलताना तर त्यासाठीही वेळ मिळतो तो कमीच. शिवाय, बोलताना समोर कोणीतरी असावं लागतं 'नुसतं बोलतो' हे काही समाजात बुद्धीवादाचे प्रतीक मानले जात नाही, की वाह दररोज ४-६ तास एकटाच बोल-साधनेत मग्न असतात वगैरे..लिहिताना कसं, एकट्यानेच बसू शकतो (नव्हे लागतं) तासन तास ..दिवसेंदिवस आणि समोर कोणी असावं लागतं नाही.. (नकोच कोणी खरं तर) ..असं लिहित बसण्याला 'लेखन साधना' वगैरे गोंडस, प्रतिष्ठित नावं हि प्राप्त होतात.. कोणासमोर बोलायचं म्हणजे फार काळजी घ्यावी लागते, इच्छा नसली तरी. समोरच्याला जरा शिव्याशाप द्यायची सोय नाही, नाही तर तो कायमचा पळालाच समजा. त्याच्या/तिच्या बाजूने घ्याव लागतं यात आपली मूळ भावव्यक्तता बदलू शकते, अर्थात हे व्यक्तीवर अवलंबून आहे पण भावना 'modulate' होते, 'sophisticate' होते एवढं तर मी म्हणूच शकतो..कितपत होते हा भाग वेगळा..
लिहिताना किंवा वाचताना जेव्हढे बारकावे लक्षात येतात तेव्हढे बोलताना आणि ऐकताना लक्षात येतात का ?..बोललेलं विरून जातं हवेत..बोलणाऱ्याला सुद्धा ते आठवणार नाही एखाद्यावेळेस की आपण काय बोललो ते..लिहिलेलं कागदावर टिकून राहतं...शिवाय प्रत्येक वेळेस वाचल्यावर वेगळं नव्याने काहीतरी समजत असतं. ऐकणं बहुतेकवेळा एकदाच होतं ! लिहिणं आणि वाचणं हे बोलणं आणि ऐकण्यापेक्षा निर्विवादपणे जास्त उपयुक्त आहे संशोधनासाठी..लिहिणं वाचणं हे एकट्याने साध्य आहे..त्यामुळे ते स्वतःच जास्त पूर्ण हि आहे !
लिहिलेलं वाचन करणारा म्हणजे म्हणजे वाचणे हि वाचणाऱ्याचीच खाज असते अखेर, लिहिणारा हे जाणून लिहू शकतो, त्यात वाचकाला शिव्या जरी हाणल्या असतील तरी तेव्हा लिहिणारा मात्र तेव्हा समोर नसतो.. ह्या शिव्या खाणं हा खरंतर वाचणाऱ्याचाच choice असतो . ऐकणं हे तेव्हढ सक्तीचं नाही..ऐकणारा काही गोष्टी लागलीच फेटाळून लावू शकतो… वाचताना त्या वाचाव्याच लागतात आणि काही काळ तरी त्या तशाच राहतात.या शिव्या शापाखेरीज..वाचन म्हणजे समोरच्याचे विचार त्याच्याच शब्दातून पाहणं .. त्याला लिहिताना मनात जे आहे ते जास्त तसच्या तसं ..modulate fodulate न होता उतरवता येतं..व्यक्तशुद्धतेचे महत्वाचे,अधिक गुण लिहिण्याला बोलण्यापेक्षा. लिहिणं हे बोलण्यापेक्षा जरा अधिक बिनधास्तच! एका संस्कृत सुभाषिताप्रमाणे आपले मुख म्हणजे अज्ञानाचे द्वार आहे आणि गांधी म्हणून गेलेत की मौनात प्रचंड सामर्थ्य आहे..तेव्हा निष्कर्ष म्हणुन आपण असं म्हणू या क की अधिक उन्नत व्हायचं असेल मानवाला तर त्यांनी त्याचं तोंड जरा बंद ठेवलेलाच बरं ?
Image Source: http://lauraberry.wordpress.com/ |

2 comments:
hmm.. ata technology mule.. bolalela havet virun jat nahi. tar youtube mule kityek jananshi direct sampark thevla jato. Me tar mhanel, ki ata boltana che havbhav video marfat distat. Pan itka matra khara ki, lihina ani bolna he apaplya jagewar bare. Ekhadya shant sandhyakali pustak asava. chaha ghetana matra aapt lokanch bolna hava.. :)
बोलण्याचं आपलं वेगळं महत्व आहेच .. मी 'संशोधनाच्या' किंवा 'मानव जातीच्या प्रगती साठी' वगैरे कोनातून म्हणतोय..:)).. तुलना कर जेव्हढ रोज लिहिलं जातं (शास्त्रीय) आणि जेव्हढ बोललं जातं त्यातून चांगला हातभार कोणत्या गोष्टीतून मिळतो ? आणि तुला असं वाटतं नाही का की ५० जणांशी तू बोलतोस तेव्हा तुला थोडं कमीच स्वातंत्र्य मिळतं, जपावं लागतं, लिहिण्यापेक्षा ? असो, व्यक्तीपरत्वेहि आहेत गोष्टी ..L&T मध्ये सुरुवातीला ट्रेंनिंग मध्ये त्यांनी सांगितलं होतं की लोकं ३ प्रकारची असतात Auditory (good with ears), Kinesthetic (who touch/contact physically while talking to make there point) and visual (good with reading)..तेव्हा ज्याला मुळात जे भावतं/कळत ते त्याच्या साठी सुकर.. पण सुकर ते सुपर असं आहे का ? :)
Post a Comment