Tuesday, December 16, 2008

तुझे आहे तुजपाशी..


आम्ही १७ मार्च २००६ रोजी सकाळी ९ च्या सुमारास लिहिलेला हा लेख इथ उतरवावा अस मनात आलं ... आणि,

"आत्ताच टॉई**ला" गेलो होतो नी अचानक काहीतरी चांगलं म्हणा, समजूतदार म्हणा.. पण तसलेच काही विचार मनात डोकाऊ लागले... म्हणलं शरिराची कोणती क्रिया चालली आहे आणि मनाची काय ? काही तारतम्यच नाही, पण वाटलं हे जे काही खत पोटात होतं कदाचित त्यातुनच काही सोनं उगवल असेल डोक्यात... (ईइइ.. म्हणु नका) बरं ते राहु दे !

विचार असे चालले होते की, बघा नं ! खूपदा आपल्याला वाटत कि समोरची व्यक्ति किती संपन्न, आहे म्हणजे डोक्याने किती सुपीक आहे अथवा किती कुशल आहे आणि त्यातुन डायरेक्ट अस वाटत कि ''यार, आपण कुठं तरी कमी आहोत.. 'अस' आपल्यात का नाही ?" ..वगैरे वगैरे...याची पुंगीच वाजवत असतो सतत कुठतरी.... म्हणजे आयुष्य जगण्यासाठी तशी काही कमतरता नसते पण आपल्याच मनाचं सौंदर्य कुठं तरी कमी पडतय असं वाटायला लागतं...त्यातुनच आपण मग नवे नवे विचार, उपक्रम पेरुन मनाची बाग अजुन सुंदर कशी बनवता येईल याचा विचार/प्रयत्न करतो..म्हणजे काहीही करुन समोरची व्यक्ती जशी आहे तसं काहीस रुजविण्याचा यत्न करतो..

... एखाद्या फुलपाखराला वाटावं कि, घार आकाशात किती उंच उंच उडते, किती रुबाबदार दिसते... केवढ्या मोठया गिरक्या घेते आपण तस नाही करु शकत.... अस म्हणुन का त्या फुलपाखराने खिन्न व्हायचं ? उलट आपल्यात सुंदर काय आहे याचा शोध त्या पाखरान घ्यावा... त्याला कोण सांगणार की फुलपाखरु उडताना पाहणार्‍याच्या मनाला जो आनंद होतो तो आनंद इतर कुठलाही पक्षी, कीटक उडताना पाहिल्यावर होणार आहे का ?...आणि त्या घारीचच म्हणलं तर तिला फुलपाखरासारखी साधी नक्कल तरी करता येणार आहे का ?

हेच..अगदी हेच आपल्या बाबतीत हि लागु होत.. पहा म्हणजे.. आपल्यातल्या बर्‍याच जणांना वाटत की मी फारसा सुंदर नाही दिसायला..माझी उंची कमी आहे... माझी देहयष्टी... 'माझी Figure' मुलींच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ! ह्याच आणि इतर अशा अनेक गोष्टी घेउन बसतात.. व स्वतःला काय जमतं आपण कशात सरस आहोत हे डोळसपणे पाहतच नाहीत... त्यांना एकच वाटत राहत, 'सुंदर मुलींकडे कसे सगळे लोक पाहतात.. एखादा धष्टपुष्ट रुबाबदार तरुण रस्त्यावरुन चालत जात असताना .. रस्त्यातल्या अर्ध्याहुन अधिक मुलींच लक्ष त्याच्याकडे असत.(मुली पाहत नाहीत सरळ ..पण लक्ष असत.. कस ते त्यांनाच विचारा, असो.) अरे 'तुम्ही' काय आहात ते पाहा !! त्यासाठी तसुभर ही वाईट वाटण्याचे कारण नाही.. तुम्हाला जर एखाद वाद्य छान वाजविता येत असेल, एखादा खेळ उत्तमपणे खेळता येत असेल,शिल्प घडवता येत असेल, गाता येत असेल, छान कविता लिहिता येत असतील, उत्तम लेखन करता येत असेल, चित्र काढता येत असतील किंवा अजुन काहीही..काहीतरी 'सुंदर' जमत असेल तर ह्या असल्या गोष्टींची कशाला काळजी करत बसता..?

प्रतिकात्मक म्हणायचे झाल्यास.. लता मंगेशकर, पु.ल. देशपांडे दिसायला कसे आहेत/होते ? तुमच्या कविता वाचनाच्या एखादा कार्यक्रम रंगला असेल अथवा सुरांची सुंदर मैफिल असेल.. अशा कार्यक्रमात 'एक हजार' सुंदर देहांची माणसं जरी बसविली तर त्यांच्याकडे कोण पाहणार आहे ? ......... हे कोणी सांगाव !

कुणीस म्हणलं आहे.. Orange is orange and apple is apple, you can't compare them ! both are equally beautiful..! आता आम्ही म्हणतो सरबत हे सरबत असतं आणि आंब्याचा रस हा आंब्याचा रस असतो.... तहान लागल्यावर आपण सरबत पिउ आंब्याचा रस नाही.. आणि ताटात पोळीसोबत खाताना आंब्याचा रसच घेउ.. लिंबु सरबत नाही..! तसच हे..' गरज फक्त आपण कोण आहोत ह्याचा शोध घ्यायची, आपल्या जमेच्या बाजु खरच कोणत्या आहेत ? हे ओळखण्याची व त्याचा आनंद घेण्याची..स्वतःतल सौंदर्य व्यक्त करता आलं पाहिजे..ते शिकलच पाहिजे..नव्हे तर त्यासाठीच झटलं पाहिजे.. आपली चमकणारी बाजुच इतकी चमकवायची की आपल्याला न चमकणारीहि बाजु आहे याचा इतरांना विसर पडला पाहिजे..! तरच आपल्याला जीवन जगण्याची कला जमली असं म्हणता येईल.. त्यासाठी आधी 'सौंदर्य' ओळखता आलं पाहिजे..! पुढे काही सुचलच नाही, कारण विधी पूर्ण झालाय हे माझ्या ध्यानात आलं.'' :))
- आशिष कुलकर्णी
-------------------------------------------------------------------------------------------------

6 comments:

prady said...

interesting ahe.. chaan lihitos! Couldn't agree more with you.

Ashish Kulkarni said...

Thanks arrey...! Malaa aayushyaat kautuk kadhich nakoy ... paN protsaahan havay..!!

prady said...

well... kautuk he eka prakare protsahana sathich asata! ninda karun kase kay protsahan denar? :)

Ashish Kulkarni said...

अरे निंदा सुद्धा प्रोत्साहित करू शकते प्रद्युम्न.... मला वाटत असं. कौतुक वेगळ आणि प्रोत्साहन वेगळ ...माझ्यासाठी तरी.... मी असच ठेवल आहे.....कारण कौतुक केलं की मी टुनकन हरभर्‍याच्या झाडावर चढतो.... खुपच लवकर यार... म्हणुन मला ते नको आहे.. आता हे indivdual वर आहे असं म्हणु शकतोस..! पण Thanks to you..!

Unknown said...

भारी रे एकदम :)
कॉलेज आठवलं... जस गप्पा मारत आहोत.

Ashish Kulkarni said...

कप्या... धन्यवाद राव..! तुझा ब्लॉग पण मी वाचत असतो ... मला आवडतो तो ब्लॉग... खूपच नीट्नेटका आहे ...चालु दे असेच..!